Monday 18 April 2016

मनात तू ध्यानात तू ..

नजरेस पडल्यापासून तू
घडलीय कसली जादू
जिकडे पाहतो तिकडे तू
प्रतिमेत तू, प्रतिबिंबात तू

मनात तू ध्यानात तू
अन मंतरलेल्या क्षणांत तू

नजरेत तू डोळ्यात तू
अन ओघळणाऱ्या अश्रूत तू

सुरांत तू  तालात तू
अंगात भिनलेल्या लयात तू

चंद्रात तू चांदण्यात तू
अन नक्षत्राच्या नक्षीत तू

सांजेत तू दिवसात तू
अन पहाटेच्या स्वप्नांत तू

सागरात तू अंबरात तू
अन रिमझिमणाऱ्या धारात तू . 

No comments:

Post a Comment