Friday 22 April 2016

काय माहिती मला पण प्रेम झाले असावे..

काय माहिती मला पण प्रेम झाले असावे
उठता बसता मुखी तुझेच नाव असावे

तुझ्या येण्याने मन माझे बहरून यावे
तुझ्या जाण्याने मन माझे कासावीस व्हावे
प्रत्येक चेहऱ्यात, तुझ्याच चेहऱ्याला शोधावे
काय माहिती मला पण प्रेम झाले असावे

हळव्या माझ्या हृदयात सदा तुलाच जपावे
आसवांना तुझ्या, स्मित हसण्यात विनावे
तुझ्या विनोदांवर लोटपोट होऊन हसावे
रुसवे फुगवे तुझे एका क्षणात संपवावे
काय माहिती मला पण प्रेम झाले असावे

दु:खाला तुझ्या स्वत:चे दु:ख अनुभवावे
सुखात तुझ्यासह सारे विसरून जगावे
भिरभिरत्या डोळ्यांत पार बुडून जावे
तुझ्या ओल्या केसांत चिंब भिजून निघावे
काय माहिती मला पण प्रेम झाले असावे..



No comments:

Post a Comment