Friday 22 April 2016

जो तुला स्वप्नातुनी पाहत होतो..

मी तोच, मी तोच
जो तुला स्वप्नातुनी पाहत होतो.
नकळतच तुजला मनोमनी चाहत होतो.

मी कसा पुरताच भुललो होतो तुला.
मी कसा आपसूक विरलो होतो तुला.

पुरता दिवाना मी, परी तुजला ना ठाव होते.
विसरलोच होतो, कोण मी अन काय माझे गाव होते.

सांगावयास तुजला, प्रयत्नांची मी शिकस्त केली.
पण तू माझी, हर अर्जी बरखास्त केली.

कसे समजावू तुला, हे मोठे कोडेच होते.
मला तुजवर नेन्हारे, मार्ग थोडेच होते.

कवितेतुनी लिहावे, दुसरे आता उरलेच नाही
वर्णावे तुजला, परी शब्द मला पुरलेच नाही..

No comments:

Post a Comment