Tuesday 19 April 2016

सांग ना गं प्रिये प्रेम काय असते..?

याच्याशिवाय अजून वेगळे काय असते
सांग ना गं प्रिये प्रेम काय असते

रोज-रोज तुझी आठवण येते
रोज तुला भेटावेसे वाटते

जेंव्हा-जेंव्हा आपली गाठ-भेट होते
बोलताना तुझ्याशी भान हरवून जाते

हातात देतेस हात जेंव्हा तू प्रेमाने
विसरून जातो मो जग सारे आनंदाने

याच्याशिवाय अजून वेगळे काय असते
सांग ना गं प्रिये प्रेम काय असते..

No comments:

Post a Comment