Wednesday 20 April 2016

तो स्पर्श सांग तुजला सांगून काय गेला..

तो स्पर्श सांग तुजला सांगून काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला

होता जरा शहारा, वेडा खुळा बहाना
ओठावरी तुझ्या का, चढवून साज गेला

संगीत शांत केले, अंधार गात गेला
बेहोश रम्य राती उधळून श्वास गेला

भिजवून अंग सारे, विझवून शब्द सारे
रंगत आज तुजला, रंगून भास गेला

तो स्पर्श सांग तुजला सांगून काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..

No comments:

Post a Comment