Wednesday 20 April 2016

तुझ्या कुशीत माझा..

तुझ्या कुशीत माझा पाषाण मोम झाला
डोळ्यात साठलेला ऋतुगंध सैल झाला

जवळी आलीस तेव्हा श्वासात कैफ आला
अन मोगरा सुगंधी लाजून धुंद झाला

अंती, गंध सारे गुलाबी ओठांवरती पहुडले
क्षण, अंगावरी बहरता जास्वंद मंद झाला

तुझ्या कुशीत माझा पाषाण मोम झाला
डोळ्यात साठलेला ऋतुगंध सैल झाला...

No comments:

Post a Comment