Sunday 17 April 2016

जिवन वेदना..

ज्यास मी आधार झालो
त्यास आता भार झालो

सोसल्या इतक्या कळा की
वेदनांचा यार झालो

लेकराशी खेळताना
उंट, घोडा, कार झालो

त्याच बाळाच्या घरी हा
वृद्ध मी बेकार झालो

नातवाच्या तोंड माझ्या
पाहण्या लाचार झालो

मीच हो माझ्या घराचा
बंधनाचा दार झालो

राहिले ना त्राण आता
वेदनेने ठार झालो

शेवटी हो आश्रमाला
राहण्या मी स्वार झालो..



No comments:

Post a Comment