Thursday 21 April 2016

तुला मनात साठवून ठेवायचे आहे...

तुझा तो हातात हात
फुलांच्या थव्यातील अरुंद वाट
क्षण हे पुन्हा जगायचे आहे
तुला मनात साठवून ठेवायचे आहे

तुझी ती गालावरची खळी
जणू गुलाबाची नाजूक कळी
डोळे भरून पुन्हा पहायचे आहे
तुला मनात साठवून ठेवायचे आहे

गालावर रुळणाऱ्या तुझ्या बटा
जणू नभातील ढगांच्या छटा
पुन्हा एकदा त्या सावरायच्या आहेत
तुला मनात साठवून ठेवायचे आहे...

No comments:

Post a Comment