Sunday 17 April 2016

श्वास मोकळे झाले..

डोळ्यातील ढगांचे श्वास मोकळे झाले
साचलेल्या मनाचे आकाश मोकळे झाले

निघून गेला होता कुडी मधून जीव
जिंदा असण्याचे भास मोकळे झाले

गुलामीलाच आमची वाटून गेली लाज
तुझ्या चरणांचे दास मोकळे झाले

पोटामधील आगीत जाळून गेली भूक
कंठात अडकलेले घास मोकळे झाले

सांगू कशास आता कुणाशीही मी नाते
पायातील बेड्यांचे फास मोकळे झाले

विझवून टाकले होते देव्हार्यातले दिवे मी
देव दिसण्याचे आभास मोकळे झाले..

No comments:

Post a Comment